संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक वर्षी एका गड/ किल्ल्याला भेट देऊन किल्ले संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे.

याहि वर्षी मिशन रायगड, मोहिम हर्षगड, लोह्गड एक दुर्गभ्रमंती, सफर कोकण यांच्या यशस्वी योजनानंतर एकता फाउंडेशन म्हसवंडी,आयोजित सिंधुदुर्ग दर्शन ( सिंधुदुर्ग किल्ला ) शनिवार व रविवार, दिनांक :- ८ व ९ डिसेंबर २०१८ रोजी यशस्वी झाले.