Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ …..!

आदिवासी समाज जो नेहमी पिढ्यान पिढ्या फक्त शारीरिक कष्टाचच जीवन जगतोय आणि गावच्या सामाजिक प्रवाहापासून शक्यतो लांब राहण्याचाच प्रयत्न करत असतो.

परंतु #म्हसवंडी गावात नेहमी प्रत्येक गोष्टीत या प्रवाहापासून लांब असलेल्या लोकांना देखील सामाजिक जीवनात आणि मुख्य प्रवाहात आनण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यात यश देखील आले आहे.

आणि जेव्हा हा समाजाचा घटक सर्व गोष्ठी विसरून या कामात आपला उस्फुर्त सहभाग नोंदवतो ते देखील तहान भूक विसरून यापेक्षा अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट कुठलीच नाही.

आपापल्या विभागात तरुणांनादेखील लाजवेल अशा प्रकारचे काम या वयस्कर मंडळींकडून केले जात आहे.

दृष्टी नाही परंतु तरी देखील श्रमदान याठिकानी केले जातंय म्हणजे या माता – माउलींच जितक कौतुक कराव तितक कमीच आहे.

गावाला आदर्शवत बनवण्यासाठी जे तुफान आलंय ते खरच अभिमानास्पद आहे.