पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१९ हि एप्रिल आणि मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला.

यावर्षी ७६ तालुक्यातील ४७०० गावांनी सहभाग घेतला त्यातून सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी तालुक्यातील, सुर्डी हे गाव राज्यात प्रथम आले. सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन…!

संगमनेर तालुक्याचा विचार केला तर तालुकास्तरीय विजेते देखील निवडले गेले. संगमनेर तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील ४६ गावांनी प्रत्येक्षात काम केले. आणि यातून १६ गावे हि अतिशय मेहनत करून स्पर्धेच्या रस्सीखेच मध्ये अग्रसर होते.

तालुकास्तरीय पहिले पाच विजेते गावे पुढील प्रमाणे:
प्रथम क्रमांक:- कुंभारवाडी
द्वितीय क्रमांक :- कणसेवाडी
तृतीय क्रमांक :- खरशिंदे
चतुर्थ क्रमांक :- म्हसवंडी
पाचवा क्रमांक : मांची

सर्व काम करणाऱ्या आणि विजेत्या गावांचे अभिनंदन.

आम्हाला अतिशय आनंद होत आहे कि म्हसवंडी गाव हे जवळपास पन्नास गावांमधून पहिल्या पाच क्रमांकामध्ये आले आहे. अगोदरच पाणलोटाचे काम झालेल्या म्हसवंडी गावाने आधीही जगाला आदर्श घालून दिला आहे आणि याच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना प्रशिक्षण देण्याचे काम पानी फाउंडेशन च्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून गेली तीन वर्षे करत देखील आहे.

हे सर्व करत असताना पुन्हा आपणच स्पर्धेत उतरून आपणच आपल्याला आव्हान देऊन अधिक पाणलोटाची कामे पुन्हा करण्याचा निर्धार घेतला आणि ती पूर्णही केली.

स्पर्धा असल्यामुळे गुणांकाच्या लढतील थोड्याश्या गुणांनी प्रथम क्रमांक जरी मिळाला नसला तरी गावाने केलेल्या इतक्या मोठ्या कार्याचा हा विजय गाव मानत आहे. खर तर पाण्याची तशी टंचाई नसणाऱ्या गावाने भविष्यासाठी केलेले कार्य हे आहे.

गावाची पाणी साठवण क्षमता किती तरी पटीने वाढली यातच गावाचे खूप मोठे यश आहे.

या स्पर्धेत प्रत्येक्ष आणि अप्रत्येक्ष ज्यांचा सहभाग लाभला आणि त्यातून इतके मोठे कार्य शक्य झाले त्या सर्वाचे मनापासून आभार.

🙏

Categories: Social