जनजागृती अभियान !!

 विषय :-    सर्पदंश – प्रथमोपचार 

कै मंगल सोपान बोडके या मातेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने म्हसवंडी गावावर शोककळा पसरली. ग्रामीण भागात वावरताना सर्पदंशाचे संकट प्रत्येकाच्या समोर सदैव उभे असते. आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परीसरात देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत . बरेचदा सर्पदंश झाल्यावर तात्काळ काय उपचार करावे किंवा ज्याला सर्पदंश झालाय त्या व्यक्तीने काय करावे हे माहीत नसल्याने मृत्यू ओढावला जातो .

IMG-20181017-WA0022

ह्या अतीशय महत्वाच्या विषयावर जनजागृती होणे हे अतीशय महत्वाचे आहे आणि ज्या गोष्टीमुळे सगळं गाव दुख:त आहे त्यावर तज्ञ मान्यवरांकडुन मार्गदर्शन व्हावे यासाठी कै मंगल सोपान बोडके यांच्या दशक्रियाविधी निमीत्त…

“सर्पदंश – प्रथमोपचार”

या संदर्भात पुणे जिल्यातील अतीशय नामवंत डॉक्टर, आणि सर्पदंशावर रामबाण उपायासाठी प्रसिद्ध असलेले

डॉ .  श्री . सदानंद दगडु राऊत ( M B B S, MD )  यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले.

दि . १६/१०/२०१८, मंगळवार,  वेळ – सकाळी ९ वाजता, स्थळ: म्हसवंडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर.

खरतर दशक्रिया विधीला व्याख्यान हा पहीलाच प्रयोग आपल्या परीसरात होत आहे. आणि नेहमीच सामजीक प्रक्रीयेत अग्रेसर असनारया या कुटुंबाने अशा स्वरुपाच्या व्याख्यानाला परवानगी दिली आहे त्याबद्दल सर्व कुटुंबाचे कौतुक .

घटना घडुन गेली आहे दुख: तर आहेच !!

पण त्यानिमित्ताने अशा व्याख्यानातुन मिळनार्या मौल्यवान विचारांमुळे किंवा शिक्षणामुळे अनेक जिव वाचतील ही भावना ह भ प सोपान बबन बोडके, ह भ प दिपक महाराज बोडके, ह भ प अक्षय महाराज बोडके  यांची आहे.

कै मंगल सोपान बोडके यांच्या दशक्रिया विधी निमीत्त
सर्पदंश उपचार तज्ञ ,
डॉ सदानंद राऊत साहेब यांचे व्याख्यान झाले .
दशक्रिया विधी निमीत्त ज्या कारणाने म्रुत्यू झाला त्यावर प्रबोधनपर व्याख्यान या उपक्रमाचे उपस्थीतांनी कौतुक केले डॉ राउत यांनी अनेक शंकाचे निरसन केले .
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतीशय संवेदनशील अशा विषयावर झालेले हे व्याख्यान  मोलाचे ठरले .