एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली.
दरवर्षीप्रमाणे वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेत या वर्षी स्पर्धेच्या रूपाने प्रोत्साहन देणारा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये म्हसवंडी गावातील साधारणपणे ८० कुटुंबांना जवळपास ४०० केशर आंब्याच्या झाडांचे वाटप करण्यात आले व त्याची स्पर्धेच्या माध्यमातून जतन होईल याप्रमाणे पुढील वर्षी तपासणी करून त्यांना बक्षिसे देण्यात येतील.
या झाडांव्यतिरिक्त गावातील सार्वजनिक ठिकाणे इतरही जवळपास शंभर झाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी परिसरातून भरगोस प्रतिसाद मिळाला. म्हसवंडी गावातील सर्वच संस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य, संस्थेंच्या सर्वच सदस्यांची मेहनत, आर्थिक पाठबळ देण्याऱ्या दातृत्वांची मोलाची साथ व सर्वच नागरिकांचे सहकार्य यांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्येक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
झाडे लावा, झाडे जगवा…!
याच उपक्रमाचे काही क्षणचित्रे.