ध्येय

समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा इतरही सर्वसमावेशक विकास करणे.

उद्देश

समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे.

मूल्य

कुठल्याही प्रकारची सामाजिक दरी न ठेवता समाजाला उपयुक्त असे सामाजिक कार्य करणे.

पंचसूत्री

ग्रामविकास

गावे आणि विशेषतः खेडी गावे हि आपल्या देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे एकात्मिक ग्रामीण विकास हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

जनजागृती

आज समाजाला अनेक गोष्टीमध्ये जागृत करणे गरजेचे आहे. आपल्या हक्काच्या मुलभूत गोष्टीपासून ते समाजपरिवर्तनाच्या वा सामजिक बांधिलकीच्या अनेक गोष्ठीपर्यंत. हि जनजागृती समाजाच्या मानसिकतेत खूप चांगल्या प्रकारे बदल घडवून आणणारी आहे.

सामाजिक ऐक्य

आज समाजात ऐक्य प्रस्थापित करायचे असेल तर सर्व समाजाने सर्व मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. जातीभेत ,वर्णभेद, उच्च नीच भेद विसरून समाजात ऐक्य प्रस्थापित करणे हा उद्देश आहे.

पर्यावरण

पर्यावरणरक्षण हि काळाची खरी गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये म्हणून त्यावर उपाययोजना हा महत्वाचा उपक्रम आहे.

शिक्षण

आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज आहे. सर्वसामान्य घरापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहचावी हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. आधुनिक आणि सर्वगुणसंपन्न शिक्षण तळागाळातील व्यक्तीला मिळावे आणि यासाठी प्रयत्न हा एक उद्देश आहे.

इतर

त्याचप्रमाणे विविध परिस्थितीनुसार निर्माण होणारे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन एकता फौन्डेशन कार्य करण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

साथ तुमची...!

प्रयत्न आमचे...!