एकता फाउंडेशनमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही करत असलेल्या सामाजिक कार्यात आम्हाला तुमच्याही मदतीच्या हाताची गरज आहे...! आमच्यासोबत सहभागी व्हा आणि सामाजिक कार्यात आम्हाला आपला मदतीचा हात द्या..!!

आमच्याबद्दल

आपन ज्या समाजात राहतो त्या समाजचे आपल्यावर उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड करन्याच्या प्रामाणीक हेतुने स्थापण झालेली अस्सल तरुणांची एक संघटना / संस्था म्हणजेच…..एकता फाउंडेशन.

एकता फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे जी एका व्हाट्स अप समुहातुन निर्माण झाली आहे .वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमीत्ताने एकत्र आलेले तरुण कायमचे एकत्र झाले ते एकता च्या रुपाने .या संस्थेच्या नावातुनच आमची आमची ताकद काय आहे ते लक्षात येते ती म्हणजे एकी. सर्वांची एकी ही एकता ची खरी ताकद आहे. कुठल्याही राजकारणात न पडता गावच्या विकासाच्या दृष्टीने आपन काहीतरी करु शकतो या भावनेने गावातीलच पण रोजीरोटी साठी इतर शहरांमधे असलेल्या तरुणान्नी एकत्र येन्याचा विचार केला आणि एका छत्राखाली सर्व एकवटले ते छत्र आहे एकता फाउंडेशन

एकता फाउंडेशन ही एक अशी संघटना आहे ज्यामध्ये कोनतेही पद अस्तीत्वात नाही. सर्वच सदस्य या संस्थेचे अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहेत आणि खजीनदार आहेत. संस्थे मार्फत काय उपक्रम घ्यायला हवा हे ज्याच्या मनात येइल तो आपले मत मांडतो, त्यावर चर्चा होते आणि सर्व मान्य असेल तर उपक्रम राबवला जातो. म्हसवंडी गावच्या विकासाचा प्राधान्याने विचार हेच एकता फाउंडेशन चे धेय्य आहे. पण आम्हास खात्री आहे आमची सीमा म्हसवंडी गावापुरती मर्यादीत न राहता आम्ही नजीकच्या भविष्यकाळात गावाच्या बाहेर देखील कार्य चालु करनार आहोत.

लोकवर्गणी आणि देणगी रुपातील मदत हाच आमचा स्रोत आहे. आम्हाला देणगी रुपात मीळालेली मदत आम्ही गरजु लोकांपर्यंत पोचवन्याचा प्रामानीक प्रयत्न करत आहोत आणि करत राहु. कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखील आमच्या संस्थेत हस्तक्षेप नाही.

केवळ निर्मळ भावनेने समाजाचे, निसर्गाचे ऋण आपल्यावर आहेत आणि त्यातुन उतराइ होन्याच्या हेतुन निर्माण झालेली ही संस्था आहे.

पर्यावरण

96%

सामाजिक उपक्रम

82%

ग्रामविकास

84%

ध्येय

समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा इतरही सर्वसमावेशक विकास करणे.

उद्देश

समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे.

मूल्य

कुठल्याही प्रकारची सामाजिक दरी न ठेवता समाजाला उपयुक्त असे सामाजिक कार्य करणे.

सांख्यकी तक्ता

अनुभव
0 +
कामे
0 +
पुरस्कार
0 +

पंचसूत्री

ग्रामविकास

गावे आणि विशेषतः खेडी गावे हि आपल्या देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे एकात्मिक ग्रामीण विकास हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

जनजागृती

आज समाजाला अनेक गोष्टीमध्ये जागृत करणे गरजेचे आहे. आपल्या हक्काच्या मुलभूत गोष्टीपासून ते समाजपरिवर्तनाच्या वा सामजिक बांधिलकीच्या अनेक गोष्ठीपर्यंत. हि जनजागृती समाजाच्या मानसिकतेत खूप चांगल्या प्रकारे बदल घडवून आणणारी आहे.

सामाजिक ऐक्य

आज समाजात ऐक्य प्रस्थापित करायचे असेल तर सर्व समाजाने सर्व मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. जातीभेत ,वर्णभेद, उच्च नीच भेद विसरून समाजात ऐक्य प्रस्थापित करणे हा उद्देश आहे.

पर्यावरण

पर्यावरणरक्षण हि काळाची खरी गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये म्हणून त्यावर उपाययोजना हा महत्वाचा उपक्रम आहे.

शिक्षण

आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज आहे. सर्वसामान्य घरापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहचावी हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. आधुनिक आणि सर्वगुणसंपन्न शिक्षण तळागाळातील व्यक्तीला मिळावे आणि यासाठी प्रयत्न हा एक उद्देश आहे.

इतर

त्याचप्रमाणे विविध परिस्थितीनुसार निर्माण होणारे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन एकता फौन्डेशन कार्य करण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

सह्याद्री पुरस्कार 2017 ….🏆

पुरस्कार

सामाजिक व दुर्गसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान ,महाराष्ट्रराज्य यांच्या तर्फे एकता फौंडेशनला यावर्षीचा सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.

राज्यभरातील निवडक ११ संस्थांना आज हा पुरस्कार पुणे येथे सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्यावतीने आमदार संजय कळकर, पै. विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी व डी वाय एस पी),श्री. भानुप्रताप बर्गे (ए टी एस प्रमुख पुणे),दुर्ग अभ्यासक श्री. श्रमिक गोजमगुंडे, श्री. गणेशखुटवड – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

सन्मान एकताचा …सन्मान प्रत्येक सदस्याचा …त्यांच्या मेहनतीचा ….! 

उपक्रम

आम्ही राबविलेले उपक्रम आणि चालू असलेले कार्यक्रम.

एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न

एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न झाला. म्हसवंडी गावातील सहभागी सदस्यांना अतिशय चांगल्या प्रतीचे पेरू, चिकू, जांभूळ असे तीन वृक्ष प्रत्येकी वाटप करून व काही झाडे सार्वजनिक ठिकाणी लावून वृक्षारोपण संपन्न Read more…

एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा

एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. सात वर्षांपूर्वी एकता फाउंडेशन चं रोपटं लावल आणि आज या रोपट्याच वट वृक्षात रूपांतर होतं आहे. नक्कीच आमच्या सर्व सदस्यांची साथ आणि कठोर मेहनत. विविध Read more…

संपर्क

कार्यालयीन पत्ता

ऑफिस नं.१, म्हसवंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर - ४२२६०२ 

फोन 

+91 82861 17475
+91 77381 98622 

ई-मेल 

contact@ektafoundation.in

ektango2016@gmail.com

सदस्य व्हा..

[ninja_form id=1]