म्हसवंडी गावाला दुष्काळातून समृद्धीकडे घेऊन गेलेला एक अवलीया… ‘आद.फादर हर्मन बाखर’.
अखंड आयुष्य गोर-गरिबांसाठी समर्पित करणारे पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक, गरिबांचा #भाकर_बाब तथा ‘आद.फादर हर्मन बाखर’ यांचे स्वीझरलँड येथे नुकतेच निधन झाले.
मूळचे स्वीझरलँड येथील असलेले परंतु त्यांनी भारतात येऊन पुणे येथे धर्मगुरुची दीक्षा घेऊन संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले. पाणलोट क्षेत्र विकासात लोक सहभाग अत्यंत महत्त्वाचा समजून पाणलोट क्षेत्राच्या विकासाला चालना दिली.
Indo German watershed development program च्या माध्यमातून पंचवीस वर्षापूर्वी स्पाान केलेल्पा WOTR संस्येचा पायलट प्रोजेक्ट म्हसवंडी गावात त्यांनी राबवला आणि त्यातून आज पाण्याने समृद्ध असलेले गावच नाहीतर जगप्रसिद्ध पाणलोट मॉडेल गाव हि त्यांनीच देन म्हणावी लागेल.
महाराष्ट्र सरकारने त्यांचा ‘कृषिभूषण’ सन्मानाने गौरव केला होता तर जर्मन सरकारनं त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मान दिला आहे. त्यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले.
म्हसवंडी गाव त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही.
संपूर्ण गावकर्यांच्या वतीने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन! 💐💐