एकता फाउंडेशन च्या पुढाकाराने व राज्याचे महसूल  मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने
आदरणीय आमदार श्री सुधीरजी तांबे, श्री इंद्रजित भाऊ थोरात, जी. प. सदस्य श्री. अजय भाऊ फटांगरे यांच्या माध्यमातून
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
आज एकता फाउंडेशन म्हसवंडी च्या सर्व सदस्यांनी घरोघरी जाऊन, कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून या सर्व वस्तूंचे वाटप केलं.
कठीण प्रसंगातही आदरणीय बाळासाहेब थोरात हे आमच्यासोबत आहेत ही भावना प्रत्येक गरजू कुटूंबांनी व्यक्त केली.