#वृक्षारोपण_आणि_संवर्धन_वर्ष ६ वे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी एकता फाऊंडेशन आयोजित वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम आज घेण्यात आला.

यावर्षी रस्त्याच्या कडेला झाडे न लावता जागा बदलून उन्हाळ्यामध्ये पानी फौंडेशन स्पर्धेदरम्यान डोंगर माथ्यावर तयार केलेल्या CCT च्या मातीच्या बांधावर ही वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ५०० रोपांची लागवड केली. यामध्ये वड, सीताफळ, आवळा , करंज, बांबू, बेढा, हिरडा, जांभूळ, चिंच, बदाम इत्यादी झाडांचा समावेश होता.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक आणि आभार.

झाडे लावूया…! झाडे जगवूया…!
एक दिवस निसर्गासाठी…!