एकजुटीने पेटलं रान …. तुफान आलया !!!

पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत म्हसवंडी गावाने देखील सहभाग घेतला आहे .
आज पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली .

महीला , पुरूष , तरुण , वृद्ध सर्वच श्रमदानामधे सहभागी झाले .

२० वर्षापूर्वी आम्ही पाणलोट प्रकल्प राबवला आणि समृद्ध झालो ……
अडवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व गावच्या लहान थोरांना माहीतीय .

म्हणून परत एकदा सगळा गाव यात सहभागी झाला .

Categories: Programs