आधुनिक जगात वावरत असताना गावातील मराठी शाळेत शिकणारी मुले कुठेही कमी राहू नये आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्याचप्रमाणे संगणकाची ओळख व्हावी या हेतूने ‘एकता फाउंडेशन’तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवंडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणदरा(म्हसवंडी ) या दोन शाळांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०१६ रोजी दोन संगणक देण्यात आले. त्या संगणकाचा वापर नक्कीच चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यात होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
Categories: Programs