आमच्याबद्दल

आपन ज्या समाजात राहतो त्या समाजचे आपल्यावर उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड करन्याच्या प्रामाणीक हेतुने स्थापण झालेली अस्सल तरुणांची एक संघटना / संस्था म्हणजेच…..एकता फाउंडेशन.

एकता फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे जी एका व्हाट्स अप समुहातुन निर्माण झाली आहे .वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमीत्ताने एकत्र आलेले तरुण कायमचे एकत्र झाले ते एकता च्या रुपाने .या संस्थेच्या नावातुनच आमची आमची ताकद काय आहे ते लक्षात येते ती म्हणजे एकी. सर्वांची एकी ही एकता ची खरी ताकद आहे. कुठल्याही राजकारणात न पडता गावच्या विकासाच्या दृष्टीने आपन काहीतरी करु शकतो या भावनेने गावातीलच पण रोजीरोटी साठी इतर शहरांमधे असलेल्या तरुणान्नी एकत्र येन्याचा विचार केला आणि एका छत्राखाली सर्व एकवटले ते छत्र आहे एकता फाउंडेशन

एकता फाउंडेशन ही एक अशी संघटना आहे ज्यामध्ये कोनतेही पद अस्तीत्वात नाही. सर्वच सदस्य या संस्थेचे अध्यक्ष आहे , सेक्रेटरी आहेत आणि खजीनदार आहेत . संस्थे मार्फत काय उपक्रम घ्यायला हवा हे ज्याच्या मनात येइल तो आपले मत मांडतो, त्यावर चर्चा होते आणि सर्व मान्य असेल तर उपक्रम राबवला जातो. म्हसवंडी गावच्या विकासाचा प्राधान्याने विचार हेच एकता फाउंडेशन चे धेय्य आहे . पण आम्हास खात्री आहे आमची सीमा म्हसवंडी गावापुरती मर्यादीत न राहता आम्ही नजीकच्या भविष्यकाळात गावाच्या बाहेर देखील कार्य चालु करनार आहोत.

लोकवर्गणी आणि देणगी रुपातील मदत हाच आमचा स्रोत आहे . आम्हाला देणगी रुपात मीळालेली मदत आम्ही गरजु लोकांपर्यंत पोचवन्याचा प्रामानीक प्रयत्न करत आहोत आणि करत राहु . कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखील आमच्या संस्थेत हस्तक्षेप नाही.

केवळ निर्मळ भावनेने समाजाचे, निसर्गाचे ऋण आपल्यावर आहेत आणि त्यातुन उतराइ होन्याच्या हेतुन निर्माण झालेली ही संस्था आहे.

सांख्यकी तक्ता

अनुभव
0 +
कामे
0 +
पुरस्कार
0 +

साथ तुमची...!

प्रयत्न आमचे...!