जेव्हा लोकचळवळ उभी राहते तेव्हा चांगला बदल हा निश्चित असतो.

अशीच लोकचळवळ म्हसवंडीवंडीमध्ये पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून भविष्याच्या पाणी बचतीसाठी उभी राहिली आहे.

 

गावकऱ्यांनी दाखवलेल्या उस्त्फुर्त प्रतिसाद आणि आतापर्यंत केलेलं काम याचे अनेक माध्यमातून कौतुक होत आहे.

 

स्पर्धेच्या दृष्टीकोनातून विचार केला तर नियोजन आणि त्याची अंमलबजावणी योग्य होन तितकच महत्वाच आहे.

म्हणूनच यात सर्वात मोठ आव्हान आहे ते श्रमदाणाद्वारे व मशीनद्वारे होणाऱ्या कामाचे.

श्रमदान तर चागंल्या प्रकारे झाले आहे. आता मशीनद्वारे टार्गेट पूर्ण करण्याची वेळ आहे.

 

गाव करत असलेल्या कामाला आणि गावाच्या विनंतीला अनेक संस्थांनी मान देऊन आपले सहकार्य नोंदवले आहे आणि मशीन कामासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीसाठी सहकार्य केले आहे.

 

गेले आठ दिवसापासून ते स्पर्धा संपेपर्यंत चार जेसीबी दररोज कामासाठीच सहकार्य हे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांनी केले आहे.

 

त्याच प्रमाणे लोकपंचायत या संस्थेनेदेखील एक पोकलेन व बुलडोजर १७ हजार घनमीटर कामासाठी दिला आहे आणि त्याचे कामदेखील त्यांच्या माध्यमातून चालू आहे.

 

WOTR वाटर संस्थेएकडून देखील बंधाऱ्यांच काम स्पर्धा चालू झाल्यापासून केलं जातंय.  त्याचप्रमाणे गावातील मळादेवी पाणलोट क्षेत्र विकास संस्था आणि मळादेवी महिला विकास समिती यांच्यामार्फत मुख्य सहकार्य होत आहे. गावातील इतर संस्थाही आपले योगदान देत आहेत.

 

शासनाकडून उत्तम काम करण्याऱ्या व या स्पर्धेत सहभाग घेत असलेल्या गावांना  मिळनाऱ्या निधीला उशीर होत असल्याने अजून होणाऱ्या जलबचतीच्या कामाला विलंब होत आहे.

 

स्पर्धेचे दिवस थोडे राहिले असल्याने जास्त यंत्रणांच्या माध्यमातून काम लवकरात लवकर करण्याचे नियोजन चालू आहे.

 

आम्हाला या कार्यासाठी आपल्याही सहकार्याची अपेक्षा आहे. आम्ही संपूर्ण गावकर्यांच्या वतीने आपणास विनंती करतो कि या कार्यात आपणही सहभागी होऊन आपला हात जलउभारणीसाठी लावावा.

 

वरील सर्व संस्था ज्यांनी आमच्या गावावर, कामावर विश्वास ठेऊन बहुमोलाची मदत केली त्यांचे खूप खूप आभार.

 

ज्या व्यक्तीला किंवा संस्थांना या मशीन कामासाठी मदत करायची असेल त्यांनी कृपया आम्हाला संपर्क करा.

 

संपर्क : ektango2016@gmail.com

 

धन्यवाद….!

जल हि जीवन है.

 

Categories: Programs