फादर हरमन बाकर ( Father Hermann Bacher )….!
वॉटर ( WOTR- Watershed Organisation Trust ) संस्थेचे संस्थापक तथा भारत सरकारच्या इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रणेते.

आज त्यांचा 95वा वाढदिवस…!

म्हसवंडी गावचा कायापालट होण्यामागे या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे.

स्विझरलँड सारख्या जगाचा स्वर्ग असनाऱ्या देशात अतिशय चांगल्या कुटुंबात जन्मलेल हे व्यक्तिमत्व. ऐनतारुण्य जीवनात अभ्यासासाठी भारतात ते आले आणि पाण्याअभावी होणारी लोकांची भयानक अवस्था त्यांनी पाहिली व त्यावरच अभ्यास करायचे ठरविले.

आपला देश सोडून महाराष्ट्रला आपली कर्मभूमी मानत गेली सहा दशके महाराष्ट्रच नव्हे तर देश पाणीदार कसा होईल यावर ते कार्य करत आहेत.

१९९३ साली वॉटर संस्थेची स्थापना केली आणि अहमदनगर जिल्यातील म्हसवंडी आणि मेंढवन गावे पाणलोट प्रकल्पातून यशस्वी करून जगाला पाणलोटाचे मॉडेल त्यांनीच दिले. म्हसवंडीसारख्या अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या गावाला त्यांनी पाणलोट प्रकल्पाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणले.

प्रकल्पाच्या काळात स्वतः उतरून त्यांनी काम केले, नुसतेच काम केले नाही तर नाबार्ड ( Nabard Online ) असेल, संगमनेर सहकारी साखर कारखाना ( Sahakarmaharshi Bhausaheb Thorat SSK Ltd Amrutnagar Sangamner ) असेल किंवा अन्य संस्था असतील यांना गावच्या विकासाच्या कामात सहभागी करून घेतले.

आज त्यांच्या संस्थेची व्याप्ती खूप मोठी झाली आहे. भारताच्या बहुतांशी राज्यात पाणी क्षेत्रात सरकारच्या आणि नाबार्डच्या सहयोगाने अग्रगण्य क्रमांकाने काम हि संस्था करत आहे. पाणी फौंडेशन ( Paani Foundation) सारख्या संस्थेची नॉलेज पार्टनर म्हणून देखील हि संस्था काम पाहत आहेत.

ते कायम म्हणायचे “पाणलोट विकासाशिवाय दुष्काळावर तोडगा निघनार नाही” आणि “जर पाणी ही समस्या असेल तर डब्ल्यूओटीआर हा तोडगा आहे. आणि आज ते सर्वांगाने सत्य ठरत आहे.

त्यांनी लावलेल संस्थेच रोपट आज वटवृक्षात रुपांतरीत झाल आहे आणि त्याच बरोबर त्यांनी जे अपरिचित म्हसवंडी गाव पाणलोट आणि विकासाच प्रयोग म्हणून आपलस केले त्याचा देखील वटवृक्ष झाला आहे आणि याचे मुख्य श्रेय देखील त्यांचेच आहे.

आज जगभरातून हजारो पर्यटक आणि अभ्यासक दररोज म्हसवंडी गावाला भेट देतात हि देखील त्यांचीच किमया आहे.

आज त्यांचा ९५ वा वाढदिवस..त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी म्हसवंडी मध्ये त्यांनी दिलेली शिकवण चालू ठेऊन वृक्षारोपण करून त्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि गावकार्यांनी ऋण जपत त्यांना शुभेच्छा दिल्या.

फादर बाकर साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हि सर्व म्हसवंडीकरांच्या वतीने प्रार्थना.

म्हसवंडी तुमचे ऋण कधीच विसरणार नाही…!

Image may contain: 1 person, close-upImage may contain: one or more people, cloud, mountain, sky, outdoor and nature

Image may contain: 18 people, people standing

Categories: Social