शताब्दी महोत्सव आयोजन ( विशेष योगदान )

अखंड हरीनाम साप्ताह शतकमहोत्सव म्हसवंडी या कार्यक्रमाच्या भव्य आणि दिव्य आयोजनाची मोठी जबाबदारी एकता फाउंडेशन घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला          

पाणी फाउंडेशन प्रशिक्षण केंद्र उभारणी ( विशेष सहकार्य )

​म्हसवंडी गाव हे पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र​ सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान स्थापित दुष्काळ निवारन, जलसंधारण तथा पाणी क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्था म्हणजे पाणी फाउंडेशन. या संस्थेतर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ पर्व तिसरे हि स्पर्धा या Read more…

विद्यालयास वेबसाईट व मोबाईल अॅप भेट.

रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या माध्यमिक शाळेसाठी एकता फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी वेबसाईट व  मोबाईल अॅप तयार करून भेट देण्यात आले. या माध्यमातून शाळेची माहिती जगभरात पोहचण्यात मोलाची मदत होणार आहे website- www.srvambi.wordpress.com Mobile App-  https://play.google.com/store/apps/details?id=grdpinfotech.ganeshsatkar.srva  

रस्ता दुरुस्तीसाठी पालकमंत्रीना निवेदन

एकता फाउंडेशन म्हसवंडी च्या वतीने अ . नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राम शिंदे साहेब यांची भेट घेउन १) आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याची दुरुस्ती २) म्हसवंडी ते पिंपरी पेंढार या रस्त्याचे डांबरीकरण या कामांसाठी निवेदन दिले . वरील रस्त्याची Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम ( जंजिरा )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि  दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक Read more…

एकता फौन्डेषण,द्वितीय वर्धापन दिन सोहळा

एकता फाउंडेशन , म्हसवंडी ” द्वीतीय वर्धापनदिन “ एकता Google app चे अनावरण येत्या दिवाळी पाडव्याला म्हणजेच २०/१०/२०१० रोजी आपल्या एकता फाउंडेशन चा द्वीतीय वर्धापनदिन साजरा होतोय .. गेल्यावर्षी आपण वर्धापनदिनाच्या दिवशी एकता फाउंडेशन च्या वेबसाईट चे अनावरण केले … Read more…

मोफत वाय फाय लोकार्पण

मोबाईल नेटवर्क चा अभाव असताना देखील एकता फौन्डेशन च्या पुढाकाराने आणि सक्रीय सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय गाव झाले आहे.  

वृक्षारोपण आणि संवर्धन टप्पा -३

“झाले लावा… झाडे जगवा “ पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.   पहिल्या पावसानंतर दिनांक Read more…

सह्याद्री पुरस्कार २०१७

 

_20170514_203556

सन्मान एकताचा …सन्मान प्रत्येक सदस्याचा …त्यांच्या मेहनतीचा ….!

_20170514_203909

सह्याद्री पुरस्कार 2017 ….🏆
 गौरव : – एकता फाऊंडेशन,म्हसवंडी.

सामाजिक व दुर्गसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान ,महाराष्ट्रराज्य यांच्या तर्फे एकता फौंडेशनला यावर्षीचा सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.

राज्यभरातील निवडक ११ संस्थांना आज हा पुरस्कार पुणे येथे सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्यावतीने आमदार संजय कळकर, पै. विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी व डी वाय एस पी),श्री. भानुप्रताप बर्गे (ए टी एस प्रमुख पुणे),दुर्ग अभ्यासक श्री. श्रमिक गोजमगुंडे, श्री. गणेशखुटवड – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा सन्मान एकता फौंडेशनच्या प्रत्येक सदस्याचा आहे त्यांनी घेतलेल्या मेहणतीचा आहे. नक्कीच हा सन्मान आम्हाला पुढील कार्यास प्रेरणा देईल.


(more…)

विशेष गौरव कार्यक्रम – भजनी मंडळ म्हसवंडी

९९ व्या अखंड हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून हनुमान प्रासादिक भजनी मंडळ म्हसवंडी वहि भजन कला आतापर्यत जपून ठेवण्यात ज्या व्यक्तींचा वाटा राहिला आहे अशा भजनीमंडळाच्या सदस्यांचा व भजनी मंडळाचा सन्मानसोहळा फौन्डेषणच्या वतीने करण्यात आला.