वृक्षारोपण आणि संवर्धन 


“या धरतीची आम्ही लेकरे, लाऊ वृक्ष पाहू वाहती झरे”

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्रदूषणावर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जनतेला सर्पण पुरवणे, इमारती लाकूड, औषधी उपयोग, असे अनेक उपकार आपली ही वृक्षराजी आपल्यावर करत असते .

12108241_1059700304049869_8786706203078019071_n

दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे.  पावसाची कमतरता भासत आहे, यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न अशा आपल्या गावाची भौतिक निर्मिती करणे ही आज काळाची गरज  आहे.

पाणलोट प्रकल्पाच्या यशस्वी प्रयोजनाने संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श देणाऱ्या  आपल्या म्हसवंडी गावाला आज पुन्हा एकदा पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संतुलित राखण्याची गरज थोड्याफार प्रमाणात निर्माण झाली असे वाटायला लागले होते. पर्यावरण जर संतुलित राखायचे असेल तर त्यावर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे वृक्षलागवड आणि संवर्धन.  पर्यावरण संरक्षण  ही काळाची गरज असून त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

11009140_1059703390716227_6462040081392100249_n

त्या उद्देशानेच एकता फौन्डेशन, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनास या मोहिमेस  सर्वोच्च प्राधान्य देवून प्रथम मोहीम हि वृक्षलागवड आणि संवर्धन हि राबवली.

दसर्याच्या शुभमुहर्तावर दिनांक २२ ऑक्टोबर २०१५ रोजी लोकसहभागातून श्रमदानातून ३०० झाडे लावण्यात आली. त्यामध्ये आंबा,गुलमोहर,सीताफळ,बदाम,लिंब,शोभेची झाडे यांचा समावेश होता. गावच्या ओढ्यापासून ते वेशीपर्यंत , मळादेवीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेने मिरशिंगमाळ पर्यंत तर  मळादेवी मंदिराच्या परिसरात हि झाडे लावण्यात आली.

नुसती झाडे लाऊन चालणार नव्हते हे समजून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेऊन संपूर्ण झाडांना संरक्षण जाळी बसवून, ठिबक सिंचन लावण्यात आले आहे आणि त्याद्वारे त्यांना दररोज पाणी देण्यात येत आहे. त्या झाडांची आज गावातील प्रत्येक व्यक्ती आपली म्हणून काळजी घेत आहे. दोन दिवस चाललेला हा एकता फाउंडेशनचा पहिला व अतिशय स्तुत्य उपक्रम ठरला.

Categories: Programs