एकता फाउंडेशन तृतीय वर्धापनदिन कार्यक्रम दिवाळी पाडवा गुरुवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला.
यावेळी या वर्षात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या म्हसवंडी गावातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये राजकीय क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका मध्ये यावर्षी नव्याने नियुक्त झालेले सभागृह नेते मा. रविंद्रजी इथापे साहेब त्याचप्रमाणे आध्यत्मिक क्षेत्रात आळंदी येथे यावर्षी सर्वोत्कृष्ट वारकरी शिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त ….शिक्षण संस्थेचे ह.भ.प. दिपक महाराज बोडके तसेच सामाजिक क्षेत्रात यु ट्युब वर आपल्या वन टेक फोटोग्राफी या चॅनल ने एक लाख सबक्रायबर चा टप्पा पार करणारे कु. वैभव बोडके तसेच शैक्षणिक क्षेत्रात बारावी मध्ये समर्थ महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या कु. कोमल सुरेश इथापे यांचा मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मागील वर्षी संस्थेने केलेल्या कार्यचा आढावा घेण्यात आला व पुढील वर्षी विविध क्षेत्रात करण्यात येण्याऱ्या कामाचे विवेचन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या नव्याने अपडेट झालेल्या वेबसाईट व अँड्रॉईड अप्लिकेशन चे देखील अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच,उपसरपंच पठारभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विधीध राजकिय पक्षांचे नेते तसेच सामाजिक कार्येकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर पासूर उत्तर महाराष्ट्रतील नंदुरबारपर्यंत तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून कोकणातील पेन, रायगड, उरण पनवेल, मुंबई पर्यंत जवळ जवळ 50 स्पर्धकांनी ग्रुप व सोलो प्रकारात सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रम आयोजनासाठी एकता फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी तसेच समस्त ग्रामस्थ मुंबईकर, व पुणेकर मंडळी म्हसवंडी यांनी मोलाची भूमिका पार पाडली
दिवाळी फेस्टीवल निमीत्त आयोजीत डांन्स स्पर्धेतील काही क्षणचित्रे …
कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी ठरला !!!
कार्यक्रम यशस्वी करन्यात मोलाची मदत मिळालेल्या दात्यांचे …. अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सभासदांचे …
तसेच महाराष्ट्रातील विविध भागातुन आलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार .