म्हसवंडी गाव हे पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र
सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान स्थापित दुष्काळ निवारन, जलसंधारण तथा पाणी क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्था म्हणजे पाणी फाउंडेशन.
या संस्थेतर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ पर्व तिसरे हि स्पर्धा या वर्षी खूप मोठ्या स्तरावर घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एकूण ९००० गावांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.
अभिनामाची गोष्ठ म्हणजे या स्पर्धेसाठी पाणलोट क्षेत्रात आदर्शवत कार्य केलेले संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी हे गाव प्रशिक्षण केंद्र असणार आहे. पुढील तीन महिन्यात महाराष्ट्रील स्पर्धेत सहभागी असणारे तब्बल अडीच हजार गावे हि म्हसवंडी ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण घेणार आहेत.
यासाठी एकता फौंडेशन तथा गावकर्यांच्या सहकार्याने पानी फाउंडेशनने गेल्या एक महिन्याच्या काळात एक प्रशस्त प्रशिक्षण केंद्र म्हसवंडीमध्ये उभारले आहे आणि आजपासून या प्रशिक्षणाची सुरवात सत्यमेव जयतेचे कार्यकारी व्यवस्थापक राहुलजी चव्हाण यांच्या यांच्या उपस्थितीत झाली.
परिसरासाठी हि एक गौरवाची गोष्ट आहे.