“झाले लावा… झाडे जगवा “
पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.
पहिल्या पावसानंतर दिनांक २५ व २६ जून रोजी हि मोहीम देखील श्रमदानातून आणि लोकसहभागातून राबवण्यात आली.
यामध्ये ५०० झाडे लावण्यात आली त्यामध्ये गुलमोहर,बदाम,लिंब,सीताफळ ई. समावेश होता.
यांनाही संरक्षण जाळी बसवून त्यांचेही संवर्धनाचे काम चालू केले आहे.