Trekkers attraction
ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट
पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली …
दुरगुडी गुहा !!
या गुहेबद्द्ल –
सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे .
या गुहेचा आकार कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम अरुंद होतो जीथे कोनाला जाता येत नाही .
येथील स्थानिक ग्रामस्थ असं सांगतात की गुहा किती खोल आहे याचा कोनीच अंदाज लावु शकत नाही .
अनेकांनी या गुहेत घुसन्याचा प्रयत्न केला मात्र ठरावीक अंतर गेल्यानंतर परत माघारी फिरावे लागले कारण पुढे पुढे याचा आकार अतीशय कमी होत जातो .
गुहेची दर्शनी बाजु भव्यदिव्य आहे .
या जागेत जवळपास ३०-४० लोकं आरामात बसु शकतात .
पुर्वी लपण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून लोक ह्या गुहेचा वापर करत .
स्थानिक ग्रामस्थ अशीही आख्यायिका सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्यात अहमदनगर वरुन जुन्नर ला जाताना या मार्गाचा वापर केला जायचा आणि रात्रीचा मुक्काम या गुहेत केला जायचा .
चहु बाजूंनी सह्याद्री पर्वत रांगा … त्यावरुन फेसाळनारे पांढरे शुभ्र धबधबे ,
धुक्याची चादर आणि वरुन कोसळनारा संतधार पाऊस
ह्या गुहेकडे जाताना या सगळ्याचा मनमोहक अनुभव येतो .
या ठीकाणी कसे पोहचावे –
मार्ग १ –
पुणे नाशीक हायवे वर बोटा हे गाव आहे .
बोटा येथुन पश्चिमेस म्हसवंडी हे गाव साधारण ८ किलोमीटर आहे
(आळेफाटा – बोटा – आंबीफाटा – म्हसवंडी )
मार्ग -२
नगर कल्याण हायवे वर पिंपरी पेंढार गाव आहे .
पिंपरी पेंढार गावातुन पुर्वेस म्हसवंडी साठी रस्ता मिळेल .
पिंपरी पेंढार पासुन म्हसवंडी साधारण ४ किलोमीटर आहे .
( हा रस्ता थोडा कच्चा आहे …. पण अंतर कमी आहे सावकाश वाहन चालवल्यास हा रस्ता उत्तम )
( आळेफाटा – पिंपरी पेंढार – म्हसवंडी )
या ठीकाणी आणखी काय पहालं
१) जागृत देवस्थान मळादेवी मंदिर आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परीसर
२) जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके
३) आणि मौज मज्जा या व्यतीरिक्त जर काही शिकायचे असेल तर म्हसवंडी गावात
पाणलोट प्रकल्प प्रशिक्षण , महीला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र आहे .
( आजपर्यंत या ठीकाणी देशातल्या सर्व राज्यांच्या एक हजारहून अधिक अभ्यास सहलीच्या टीम येउन गेल्या आहेत , तसेच जवळ जवळ 50 हून अधिक देशाच्या विविध टीम येथे भेट देउन गेल्या आहेत )
टीप – या केंद्राला भेट द्यायची असेल तर आधी तसं कळवावे लागते
संपर्क –
दिलीप सातकर – 9763029634
शिवाजी बोडके – 9623747800
गणेश सातकर – 9960759032
किरण शांताराम बोडके – 9172863757
नवनाथ ईथापे – 8286117475
ईथे गेल्यावर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
– या गुहेकडे जान्यासाठी जो रस्ता आहे तीथे बाजुलाच तलाव आहे … पोहता येत नसेल तर यात उतरन्याचा उतावळेपणा करु नये .
– गुहेकडे जाताना स्थानिक ग्रामस्थांच्या पाउलवाटेवरूनच जावे … उगीच अवघड रस्ता शोधून धोका वाढवु नये .
एक दिवसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर म्हसवंडी – दुर्गुडी गुहा हा बेस्ट पर्याय आहे .
एकदा भेट द्याच …!!